अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह तिला दमदाटी केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्यासोबत लग्न कर. अन्यथा खासगी फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन,’ अशी धमकी देवून विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह तिला दमदाटी केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्यासोबत लग्न कर. अन्यथा खासगी फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन,’ अशी धमकी देवून विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात संशयित युवकाला त्याच्या आईने सहकार्य केल्याने दोघांवर तक्रार दाखल झाली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 2020 पासून वेळोवेळी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.