अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2023 ते 16 ऑक्टोबर 2024 दरम्यान सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिच्या भावाला मारहाण केल्याप्रकरणी आकाश बाळकृष्ण मेकले रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.