विनापरवाना फ्लेक्स प्रकरणी एकावर कारवाई
विनापरवाना फ्लेक्स लावून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : विनापरवाना फ्लेक्स लावून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान जकातवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर पवन लाहोटी रा. राजपथ, सातारा यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता विनापरवाना फ्लेक्स लावला होता. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.