अवैध दारु वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा
राधिका रस्ता ते पोळ हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यावर जीपमधून अवैध दारू करताना पोलिसांनी एकाला पकडले.
सातारा : राधिका रस्ता ते पोळ हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यावर जीपमधून अवैध दारू करताना पोलिसांनी एकाला पकडले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणी नीलेश नारायण गायकवाड (वय 38, रा. मोरघर, ता. जावळी) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या ताब्यातून देशी दारूच्या सुमारे 13 हजार 440 रुपयांच्या 192 बाटल्या व एक जीप पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई दि. 15 रोजी रात्री नऊ वाजता पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ यांनी केली.