अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शांताराम कोंडीबा खरात राहणार माची पेठ सातारा हे समर्थ मंदिर रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशास तोंडाला रुमाल बांधून उभे असलेले दिसून आले. अधिक तपास पोलीस हवालदार डमकले करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, सातारा शहरातील जुना मोटर स्टॅन्ड आयडीबीआय बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या एका पान शॉप च्या आडोशास राज श्रीमंत वैराट रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा हा अंधारात आपला चेहरा दाखवून उभा असलेला दिसून आला. अधिक तपास महिला पोलीस नाईक करपे करीत आहेत.