राष्ट्रीय महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कन्टेनरला (एमएच 14 केए 5245) कारची (एमएच 14 बीसी 5029) पाठीमागून धडक बसली. ही घटना रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दि. 4 रोजी घडली.
सातारा : राष्ट्रीय महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कन्टेनरला (एमएच 14 केए 5245) कारची (एमएच 14 बीसी 5029) पाठीमागून धडक बसली. ही घटना रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दि. 4 रोजी घडली.
यात दिलीप भास्कर सातपुते (वय 29, रा. नागोळे, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली), श्रीमती सुरेखा अशोक होलमुखे (वय 47, रा. करवडी, ता. सातारा) हे गंभीर जखमी झाले. यामध्ये कारचालक दिलीप सातपुते याचा मृत्यू झाला.
मृताचा भाऊ नितीन भास्कर सातपुते (वय 28, रा. नागोळे, ता. कवठे महाकाळ, जि. सांगली) यांने फिर्याद दिली असून, सुरज बमभोला पाल (वय 21, उत्तर प्रदेश) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मार्डे तपास करत आहेत.