देगाव फाटा परिसरात सुमारे दीड लाखांची घरफोडी
देगाव फाटा परिसरात अज्ञात दोन चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : देगाव फाटा परिसरात अज्ञात दोन चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी देगाव फाटा येथे असलेल्या निवान टाटा मोटर्स येथील ऑफिसमध्ये रात्री तीन ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात दोन तरुणांनी घुसून ऑफिसच्या ड्रॉवर मधून एकूण एक लाख 47 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहेत.