पंतप्रधान कार्यालयाची कायदेशीर सल्लागार म्हणून मिरवणारी कश्मिरा पवार हिला सुमारे 15 कोटींच्या फसवणूक प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यासोबत अन्य सात जणांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातारा : पंतप्रधान कार्यालयाची कायदेशीर सल्लागार म्हणून मिरवणारी कश्मिरा पवार हिला सुमारे 15 कोटींच्या फसवणूक प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यासोबत अन्य सात जणांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंतप्रधान कार्यालयाची कायदेशीर सल्लागार म्हणून मिरवत असलेली कश्मिरा पवार हिने सातार्यासह पुणे, कराड, कोल्हापूर आदी ठिकाणी नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील एका गुन्ह्यात काही दिवसांपूर्वीच तिला अटकही करण्यात आली होती.
अशाच एका प्रकरणात पुणे येथील सुषमा खामकर नावाच्या महिलेस महाराष्ट्रातील शाळांना गणवेशाचे टेंडर मिळवून देते, असे सांगून त्यांच्याकडून सुमारे 14 कोटी रुपये तिने घेतले मात्र प्रत्यक्षात कोणतेही टेंडर न देता तिची आर्थिक फसवणूक केली आहे. खामकर या महिलेची काश्मिरा सोबत अनिल वायदंडे याच्या माध्यमातून ओळख झाली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कश्मिरा संदीप पवार, गणेश हरिभाऊ गायकवाड, युवराज झळके, राधा युवराज झळके, अनिल वायदंडे (मयत) अनिता जाधव, दशरथ जाधव, अमित भरत वायदंडे सह आठजणांवर कारवाई करण्यात आली. यातील अनिल वायदंडे हे मयत असल्याने त्यांना सोडून बाकीच्यांना सातारा पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा नोव्हें 2019 ते डिसेंबर 2022 या दरम्यान घडला आहे. गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम 14 कोटी 73 लाख 40 हजार 485 रुपये इतकी आहे. कश्मिरा हिनेे या फसवणुकीमध्ये पाच कोटी रुपयांची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे शिक्का असलेले तसेच राजमुद्रा असलेली बनावट टेंडर प्रत खामकर यांना दिल्याने त्यांना विश्वास झाला होता. मात्र प्रत्यक्षात असे कोणतेही टेंडर नसल्याचे फिर्यादीच्या नंतर लक्षात आले.
त्या फसवणुकीमुळे तक्रारदाराचे कुटुंबिय अस्वस्थ झाल्याने त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे फिर्याद देण्यास विलंब झाला. कश्मीरा पवार हिला न्यायालयासमोर उभे केले असता तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप म्हेत्रे करीत आहेत.