जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचा भंग करुन तसेच हातात तलवार घेवून फिरताना आढळल्याप्रकरणी सुश्रीत तानाजी सावंत (वय 21, रा. सैनिक नगर, सदरबझार, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचा भंग करुन तसेच हातात तलवार घेवून फिरताना आढळल्याप्रकरणी सुश्रीत तानाजी सावंत (वय 21, रा. सैनिक नगर, सदरबझार, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 4 रोजी माहुली गावच्या हद्दीत संगमनगर कॅनॉलच्या जवळ सावंत आढळून आला. त्याच्यावर पोलीस शिपाई मच्छिंद्रनाथ माने यांनी कारवाई केली. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.
तसेच दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऋतिक ऊर्फ बाबा अजय जाधव (वय 22, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा) याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे यांनी दि. 4 रोजी कारवाई केली. त्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.