मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनगाव गावच्या हद्दीतील खिंडवाडी ते सोनगाव जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर मानवी अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सातारा तालुका पोलिसांनी येथे छापा मारला असता गणेश मनोहर भोसले रा. कोरेगाव ता. सातारा, ईश्वर सुभाष जाधव रा. विलासपूर सातारा, वीरेंद्र महेंद्र जाधव रा. सदर बाजार सातारा आणि एक महिला यांनी आपापसात संगनमत करून दोन महिलांच्या गमनाचा मोबदला स्वतःच्या उपजीविकेसाठी स्वीकारणे तसेच पीडित महिलांना ग्राहकांसाठी उद्युक्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांकडून रोख रकमेसह मोबाईल्स आणि दोन दुचाकी असा दोन लाख 27 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक तांबे करीत आहेत.