पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी मालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी मालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यादोगोपाळ पेठ येथून तेथीलच सिद्धेश सुभाष माने हे पायी जात असताना तेथीलच ऋषिकेश हिरवे यांनी पाळलेल्या कुत्र्याला बांधून न ठेवता निष्काळजीपणे रस्त्यावर सोडल्याने त्या कुत्र्याने माने यांच्या पोटरीवर चावा घेऊन त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी हिरवे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक यादव करीत आहेत.