मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचे कारणावरुन चिडून जावून युवकाने घरावरती दगड मारुन सोलर फोडले. तसेच मुलीला मारहाण केली. हा प्रकार सातार्यात घडला.
सातारा : मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचे कारणावरुन चिडून जावून युवकाने घरावरती दगड मारुन सोलर फोडले. तसेच मुलीला मारहाण केली. हा प्रकार सातार्यात घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सनी पाटील (रा. मंगळवार तळे, सातारा), कुमार गायकवाड (रा. सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 2 डिसेंबरला घडला.
फिर्यादीत नमूद केले आहे की, सनी पाटील याच्याशी लग्न करण्यासाठी मुलीने नकार दिला होता. त्यामुळे संशयित आरोपींनी घरावर दगडे मारुन सोलर फोडले. तसेच बेडरुमच्या खिडकी व दारे जोरात वाजवले. फिर्यादीची मुलगी, वडील, मुलाला हाताने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. पोलीस नाईक बोराटे तपास करत आहेत.