महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
महिलेच्या विनयभंग प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोनजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : महिलेच्या विनयभंग प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोनजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंगावर वाहन का घातले? असा जाब विचारल्याच्या कारणातून चिडून जावून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मयुर पवार, राजेंद्र पवार (रा. सहकारनगर, खेड, सातारा) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.