अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे
सातारा शहर परिसरात पोलिस गस्त घालत असताना संशयास्पदरीत्या फिरणार्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सातारा : सातारा शहर परिसरात पोलिस गस्त घालत असताना संशयास्पदरीत्या फिरणार्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चार भिंती ते साई बाबा मंदीर रोडवर चेहरा लपवून अस्तित्व लपवल्याप्रकरणी विष्णू मोतीराम बनपट्टे (वय 32, रा. केसकर पेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 12 नोव्हेबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दुसरा गुन्हा सागर बापू सुर्यवंशी (वय 35, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 12 नोव्हेबर रोजी पोलिसांनी मोळाचा ओढा ते बुधवार नाका या रस्त्यावर ही कारवाई केली आहे.