चार जणांना मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा
चार जणांना मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : चार जणांना मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंह नगर, खेड, ता. सातारा येथे राजेंद्र गोरख ओव्हाळ, अजय गोरख ओव्हाळ, विजय गोरख ओव्हाळ तसेच माया लोंढे सर्व रा. प्रतापसिंह नगर खेड सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच संजय वाघमारे, राजू वाघमारे, हरिश्चंद्र वाघमारे, गौतम वाघमारे, पृथ्वी वाघमारे, निलेश प्रकाश ताकपिरे उर्फ काळ्या, मेघराज राजू वाघमारे, रवी ताकपिरे, अमित साबळे, सुमित साबळे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत