पोवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी
पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विजय उत्तम तुपे रा. करंजे पेठ, सातारा यांनी पोवई नाका येथील कासट मार्केट मधील धनलक्ष्मी कपड्याच्या दुकानासमोर पार्क केलेली त्यांची दुचाकी क्र. एमएच 11 डीपी 8692 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.