एकावर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा
एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघां विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघां विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जुना मोठा स्टॅन्ड भाजी मंडई येथे लक्ष्मण लाला जाधव, अशोक गोविंद जाधव, राम लाला जाधव सर्व रा. नामदेव वाडी झोपडपट्टी, सातारा हे भांडण करीत असताना भांडणे करू नका असे म्हटल्याच्या कारणावरून अरुण गोरख पिटेकर रा. नामदेव वाडी झोपडपट्टी, सातारा याच्या डोक्यात राम लाला जाधव याने कोयता मारून त्यांना जखमी केले. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.