मल्हार पेठेत एकावर कोयत्याने वार करुन त्याला जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मल्हार पेठेत एकावर कोयत्याने वार करुन त्याला जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील मल्हार पेठेतील एका दुकानासमोर दोघांनी युवकावर कोयत्याने वार करत मारहाण केली. हा प्रकार दि. 5 रोजी घडला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात रुद्राक्ष संतोष रणदिवे (वय 17, रा. दुर्गापेठ, सातारा) याने फिर्याद दिली असून, ऋतुराज गायकवाड, शुभम वायदंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.