चेष्टा-मस्करीच्या कारणातून युवकांच्या गटात मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, ही घटना कास रस्त्यावरील यवतेश्वर गावच्या हद्दीतील हॉटेल डायमंड पाठीमागे घडली आहे.
सातारा : चेष्टा-मस्करीच्या कारणातून युवकांच्या गटात मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, ही घटना कास रस्त्यावरील यवतेश्वर गावच्या हद्दीतील हॉटेल डायमंड पाठीमागे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अथर्व जाधव (रा.करंजे) व मुजाहिद मुल्ला (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) या दोघांविरुध्द आकाश बाळकृष्ण मकले (वय 20, रा. आकाशवाणी झोपडपट्टी) या युवकाने तक्रार दिली आहे.
दुसरी तक्रार अथर्व विजय जाधव (वय) या युवकाने आकाश मॅकले, अभिषेक मॅकले, राहूल चव्हाण (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 16 ऑक्टोबर रोजी घडली आहे.