मुळीकवाडी(पो. तासगाव ता. सातारा) येथील 36 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सचिन धोंडीबा सावंत असे त्याचे नाव आहे.
सातारा : मुळीकवाडी(पो. तासगाव ता. सातारा) येथील 36 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सचिन धोंडीबा सावंत असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार दि. 16 रोजी रात्री 9 वाजण्यापूर्वी सचिन सावंत याने लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेतला. ही बाब हणमंत सावंत यांना कळताच त्यांनी सातारा तालुका पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता तो मयत झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.