मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा
मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पंताचा गोट सातारा या ठिकाणी सुहास देवानंद कारंडे रा. पंताचा गोट, सातारा यांना तेथीलच अक्षय संजय कारंडे, चंद्रशेखर लक्ष्मण कारंडे, संजय लक्ष्मण कारंडे यांनी मारहाण केली. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.