नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडणून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळयाची उत्सुकता जगाला लागून राहिली आहे.
मुंबई : नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडणून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळयाची उत्सुकता जगाला लागून राहिली आहे. कोणकोणत्या राष्ट्राचे प्रमूख या सोहळ्याला येणार आहेत याकडे जगातील माध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे.
आता आलेल्या नवीन माहितीनुसार चिनचे अध्यक्ष शि जिनपींग यांना स्वतः डोनाल्ड ट्रॅम्प यांनी आमंत्रित केले असल्याचे समोर आले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेन सीबीएस न्यूजचा हवाला घेऊन हे वृत्त दिले आहे.
एनबीसी या वृत्त वाहिनीला डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच मुलाखत दिली यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की गेल्या आठवड्यात चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्याशी ते फोनवरून थेट बोलले आहेत. दरम्यान शि जिनपिंग यांनी हे आमंत्रण स्वीकारले की नाही ते अजून स्पष्ट झालेले नाही.
सध्या अमेरिकेला सर्वच क्षेत्रात टक्कर देणार देश म्हणून चिनेचे नाव आघाडीवर आहे. तंत्रज्ञानाच्या लाटेत हे दोन्ही देश आपले स्थान बळकट करण्यासाठी नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभारलेले जगाने पाहिले आहे. तंत्रज्ञानाबरोबरच, परराष्ट्र धोरण, राजकारण, मुत्सद्देगिरी यामूळे चिन व अमेरिका यांचे संबध ताणलेले दिसतात.
त्यामुळे शि जिनपिंग यांना शपथविधी सोहळ्याला आमंत्रण दिल्यामूळे जगातील राजकीय विश्लेषकांना आश्चर्य वाटत आहे. त्यामूळे ट्रम्प प्रशासनाची धोरणे चिनशी जुळवून घेतील असे अनेकांना वाटू लागले आहे. तसेच ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनात मूळ चिनी असलेल्या नागरिकांना महत्वाची पदे देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
विषेश म्हणजे निवडणूक प्रचारावेळी ट्रम्प यांनी बिजिंग येथून सर्वाधिक तस्करी होणाऱ्या फेंटॅनाइल या नशेच्या औषधावर प्रतिबंध न घातल्याच चायनिज वस्तूंवर १० टक्के अधिक अबकारी कर लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी चिनी माध्यमांनी या निर्णयामूळे दोन्ही देशातील व्यापारावर विपरीत परिणाम होऊन संबध बिघडतील असे भाकित केले होते.
दरम्यान बुधवारी अमेरिकेतील चिनी ॲम्बेसिटर शी फेंग यांनी चिन अमेरिकेशी संवाद वाढवू शकतो असे म्हटले आहे. एकंदरीत घडामोडी पाहता चिनचे राष्ट्राध्यक्ष पुढील महिन्यात होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळयास हजेरी लावती अशी शक्यता व्यक्त होत आहे.