दोन लाखांच्या सिगारेट बॉक्सची चोरी
करंजे पेठेतील 2 लाख रुपये किंमतीचे सिगारेटचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : करंजे पेठेतील 2 लाख रुपये किंमतीचे सिगारेटचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील करंजे पेठ येथे अज्ञात चोरट्यांनी सिगारेटच्या असलेल्या साठ्यावर डल्ला मारला. बंद खोलीमध्ये असलेली व्हीएसटी कंपनीची ४ बॉक्स असलेली २ लाखाची सिगारेट चोरी झाली. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरी केली. ही घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी अक्षय दत्तात्रय पवार (वय २८, रा. करंजे, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.