एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी
एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमरलक्ष्मी, एमआयडीसी येथून अज्ञात चोरट्याने एमएच ११ सी ३४१२ या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. २९ ऑक्टोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.