पाकिस्तानमध्ये 30 दहशतवाद्यांना कंठस्नान
पाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान लक्की मारवत, करक आणि खैबर जिल्ह्यांमध्ये तीन वेगवेगळी ऑपरेशन्स करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
दिल्ली : पाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान लक्की मारवत, करक आणि खैबर जिल्ह्यांमध्ये तीन वेगवेगळी ऑपरेशन्स करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
खैबर पख्तूनख्वा प्रांतात तीन वेगवेगळ्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. पाकिस्तानमधील लक्की मारवत, करक आणि खैबर जिल्ह्यांमध्ये लष्कराकडून दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली. लक्की मारवत जिल्ह्यात 18 लोकांचा मृत्यू झाला.