कुमठे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार : रमेश उबाळे
कोरेगाव तालुक्यातील कुमठे जिल्हा परिषद गटातून आपण निवडणूक लढावणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील कुमठे जिल्हा परिषद गटातून आपण निवडणूक लढावणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
रमेश उबाळे हे ल्हासुर्णे गावचे आहेत. ल्हासुर्णे पंचायत समिती तसेच कुमठे पंचायत समिती गण असा मिळून कुमठे जिल्हा परिषद गटाची रचना आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, असा रमेश उबाळे यांचा राजकीय प्रवास राहिला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक जनअंदोलन उभारून सर्वसामान्य घटकातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. कोरेगाव तालुक्यातील भीमनगर -दरे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे खात्याने घेतल्या. अनेकवर्षे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबादला मिळाला नव्हता. रमेश उबाळे यांनी आमरण उपोषण करुन येथील शेतकऱ्यांना मोबदला मिळवून दिला. प्रशसनात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात रमेश उबाळे यांनी आवाज उठवला. कोरेगाव तालुक्यातील अनेक निकृष्ट दर्जाच्या रस्त्यातील भ्रष्टाचार उघड केला. सातारा-पंढरपूर, सातारा-पुणे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार, मेडिकल कॉलेज, कोरेगाव नगर पंचायतीने केलेल्या निकृष्ट कामाविरोधात आमरण उपोषण, धरणे अशी यशस्वी आंदोलने करुन प्रशासनातील अधिकाऱ्यांना रुळावर आणत पारदर्शक काम करायला त्यांनी भाग पाडले आहे.
याशिवाय रमेश उबाळे यांनी जात, पात, धर्म न पाहता माणूस म्हणुन अनेकांना आर्थिक मदतीचा हात देऊन सहकार्य केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची मोफत पुस्तक स्वखर्चाने दिली आहेत. अनेक दिव्यांग बांधवाना स्वखर्चाने सायकली, व्यवसायासाठी पत्र्याचे शेड (टपरी) स्वखर्चाने दिले आहे. जिल्हा परिषद गटात कुमठे, शिरढोण, ल्हासुर्णे, चिमणगाव, जळगाव, तडवळे, जांब, त्रिपुटी, मंगळापूर सह सर्वच छोट्या, मोठ्या गावांशी त्यांचा अनेकवर्षांचा संपर्क राहिला आहे. या गावातील लोकांशी निगडित असलेले प्रश्न शासन दरबारी उपस्थित करुन त्यांनी न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिलांचे प्रश्न रमेश उबाळे यांनी सोडविले आहेत. जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांमध्ये रमेश उबाळे यांचे जिवाभावाचे कार्यकर्ते आहेत. कुमठे जिल्हा परिषद गटातील अनेक गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीत रमेश उबाळे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन ग्रामपंचायत जिंकून आणण्यासाठी प्रयत्न केला असल्याने अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे निकटचे, कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. चार वर्षांपूर्वी झालेल्या ल्हासुर्णे ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी रंग भरण्याचे महत्वपूर्ण काम केले होते. जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच गावातील अनेक कार्यकर्त्यांनी रमेश उबाळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच मोबाइवरून संपर्क साधत त्यांना कुमठे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी विनंती केल्यानंतर आपण कुमठे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले असल्याने या गटाची निवडणूक रंगतदार होईल, अशी चर्चा राजकीय वर्तळात आहे.
गटाच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहे : रमेश उबाळे
जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण झाल्यानंतर कुमठे जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी तसेच सर्वसामान्य घटकातील लोकांनी आपणास निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्राहाखातर तसेच कुमठे गटाच्या विकासाचा अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया रमेश उबाळे यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षातून की अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात ?
भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी असा रमेश उबाळे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. पीपल्स रिपब्लिकन हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याने रमेश उबाळे पीपल्स रिपब्लिकन पार्ट्यातून की अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगु लागली आहे.