शिवसेनेच्या रणरागिणींची थेट महिला आयोगाकडे धाव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांनी सासपडे प्रकरणातील पीडीतेला तात्काळ न्याय द्यावा व नराधमाला कठोर कारवाई व्हावी.
सातारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांनी सासपडे प्रकरणातील पीडीतेला तात्काळ न्याय द्यावा व नराधमाला कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे करत त्यांच्या शेजारी बसलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले.
सासपडे तालुका सातारा येथील आर्या चव्हाण या अल्पवयीन मुलीची निर्दयपणे हत्या करण्यात आली. या हत्येला जबाबदार असणारा राहुल यादव सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या उपनेते छायाताई शिंदे यांनी केली आहे.
यावेळी महिला आघाडीच्या फलटण संपर्कप्रमुख सुशीला जाधव, कल्पना गीते, संगीता जाधव, अमृता पाटील, कांताबाई पवार, नंदा आठल्ये, दिव्या पवार, पायल पाटील, ऐश्वर्या पाटील, शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत, आशुतोष पारंगे, राहुल जाधव, रवींद्र भणगे, शैलेश बोडके इत्यादी यावेळी उपस्थित होते.
या निवेदनात नमूद आहे की सातारा जिल्ह्याला पुरोगामी परंपरा आहे. छत्रपतींच्या या भूमीमध्ये स्त्री शक्तीचा आणि स्त्री अस्मितेचा नेहमीच सन्मान केला जातो. अशावेळी सासपडे तालुका सातारा येथील तेरा वर्षे युतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर तिची राहुल यादव या नराधमाने हत्या केली, हा प्रकार एकूणच मानवतेला कळीमा फासणारा आहे. या प्रकरणातील खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि नराधमाला कठोर शासन करण्यात यावे. याबाबत निर्णय झाल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन उभे करेल असा इशारा देण्यात आला आहे.