अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर गुन्हा
सदरबझार येथे स्वत: चे अस्तित्व लपवल्याप्रकरणी सतिश शिवाजी जाधव (वय ३४, रा. लातूर) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सदरबझार येथे स्वत: चे अस्तित्व लपवल्याप्रकरणी सतिश शिवाजी जाधव (वय ३४, रा. लातूर) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दि. ९ ऑक्टोबर राेजी ही कारवाई केली आहे. संशयिताने स्वत:चा चेहरा लपवला होता व तो अपराध करण्याच्या उद्देशाने वावरत असल्याचे पोलिसांना वाटल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.