उत्साहपूर्ण वातावरणात नमो युवा रन संपन्न
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो युवा रन राजधानी सातारा २०२५ उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.
सातारा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो युवा रन राजधानी सातारा २०२५ उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाली. देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सुशासन पंधरवडा आयोजित करण्यात येतो. या अंतर्गत युवा मोर्चा तर्फे "नशामुक्त भारत" या टॅगलाईन खाली "नमो युवा रन २०२५ राजधानी सातारा" ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.
संपूर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यात आजच्या एका दिवसात "नमो युवा रन" घेण्याचे शिवधनुष्य भाजपा युवा मोर्चाने लिलया पेलले.
सातारा जिल्ह्यातील या उपक्रमात २५०० स्पर्धकांनी भाग घेतला. पोलीस परेड ग्राउंड वरून चालू झालेली ही स्पर्धा शिवतीर्थ -नगरपालिका -गोलबाग -मोतीचौक -पोलीस अधीक्षक कार्यालय- शिवतीर्थ- पोलीस परेड ग्राउंड अशी पूर्ण झाली. या स्पर्धेचे अंतर ५५०० मीटर एवढे होते.अतिशय उस्फुर्तपणे स्पर्धकांनी या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला.
या कार्यक्रमाचे अतिशय नेटके असे नियोजन करण्यात आले होते. संयोजन समिती मधील रेस अध्यक्ष अतुलबाबा भोसले यांच्यासह रेस अध्यक्ष
सुनील तात्या काटकर, उप-रेस अध्यक्ष अविनाश कदम, सोमनाथ (काका) धुमाळ, संग्राम बर्गे, रेस सल्लागार संदिप भाऊ शिंदे, सचिव चिन्मय कुलकर्णी, समन्वयक संतोष कणसे, धनाजी पाटील काका, कोषाध्यक्ष बाळासाहेब खरात, पंकज चव्हाण, उपकोषाध्यक्ष समीर निकम, रेस डायरेक्टर डॉ. दयानंद घाडगे, डॉ. नीलेश थोरात, सह रेस डायरेक्टर विकास गोसावी, लक्ष्मण कडव, प्रविण धस्के, अमोल सणस, बाळासाहेब राक्षे, शफी इनामदार, हृदयनाथ पार्टे, अविनाश खर्शीकर, वैशाली टंगसाळे, एम. आर. राजेंद्र बर्गे यांनी आपल्या जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडल्या.
या मॅरेथॉन साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून राजू शेळके, सागर निंबाळकर हे दोघे होते. यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, लोकसभा समन्वयक सुनिल काटकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांच्या हस्ते मॅरेथॉन ला झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली.
यावेळी काकासाहेब धुमाळ, भाजप नेते रामकृष्ण वेताळ, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अविनाश कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, महिला मोर्चा प्रदेश पदाधिकारी चित्रलेखा माने कदम, सुवर्णा पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष भारत जंत्रे, अनुजाती मोर्चा अध्यक्ष अमित भिसे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, सांस्कृतिक विभागाचे पंकज चव्हाण, भा ज पा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, हर्षवर्धन शेळके, रोहित सावंत, अमोल कांबळे, गौरव इंगवले, कु. पायल जाधव,
दिपक फाळके, विशाल कुलकर्णी, विशाल घोरपडे, ओंकार पाटील, अक्षय थोरवे, गणेश जायगुडे, वैभव सकुंडे, प्रवीण शिंदे, शिवम सूर्यवंशी, निलेश भोसले, प्रशांत पोतेकर, संदिप माने, तेजस कदम, आशिष सकुंडे, प्रशांत जाधव, सनी साबळे, अनिकेत निकम, यशोवर्धन मुतालिक, श्रीधर हादगे, अक्षय चांगण, रोहिदास नवसरे, इम्तियाज मुलाणी, यश माने, रत्नदीप जाधव, हर्षल गुरव, ऋषिकेश पाटील, प्रथमेश इनामदार, नरेंद्र सावंत, प्रथमेश मोरे, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, विक्रांत भोसले, विक्रम बोराटे, रीना भणगे, नीता रणदिवे, वृषाली दोशी, सुचारिता कंडारकर, गौरी गुरव, वैष्णवी कदम, रोहिणी क्षीरसागर, नंदा इंगवले, निशा जाधव, अश्विनी हुबळीकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.