मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस एम देशमुख यांचा सत्कार करताना डिजिटल मीडिया परिषदेची सातारा टीम
आपल्या कुटुंबीयाकडे दुर्लक्ष करत नेहमीच पत्रकार हेच कुटुंब मानून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देणारे पत्रकारांचे आधारस्तंभ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस एम देशमुख सर यांचा डिजिटल मीडियाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात सातारा डिजिटल परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
सातारा : आपल्या कुटुंबीयाकडे दुर्लक्ष करत नेहमीच पत्रकार हेच कुटुंब मानून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देणारे पत्रकारांचे आधारस्तंभ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस एम देशमुख सर यांचा डिजिटल मीडियाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात सातारा डिजिटल परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर विश्वस्त किरण नाईक,शरद पाबळे,मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर,डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे तसेच मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळेला सातारा डिजिटल परिषदेच्या वतीने डिजिटल मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष (सनी) शिंदे,जिल्हा संघटक शरद गाडे, महेश चव्हाण, महेश पवार, अली मुजावर, संजय कारंडे, तन्मय पाटील, संतोष वायदंडे, सचिन मदने, अक्षय मस्के, अक्षय शेवाळे, सुरज जगताप त्याचबरोबर राज्यातील डिजिटल मीडियाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
डिजिटल मीडियाचे पहिले राज्यव्यपी अधिवेशन हे छत्रपती संभाजी नगर येथे पार पडले, त्यावेळेला हा सन्मान करण्यात आला.
राज्यातील पत्रकारांवर गेली अनेक वर्ष हल्ले होत आहेत त्यावर आवाज उठवून पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकार संरक्षण कायदा निर्माण केला. राज्यातील अनेक पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष केले आणि पत्रकार हेच कुटुंब मानून गेले. अनेक वर्ष पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असणारे पत्रकारांचे खंबीर नेतृत्व मा.एस एम देशमुख यांचा त्यांच्या या कार्याबद्दल सातारा डिजिटल मीडिया च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.