शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीचे साताऱ्यात माझं कुंकू, माझा देश आंदोलन
सातारा शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने रविवारी शिवतीर्थ पोवई नाका येथे माझं कुंकू माझं देश हे आंदोलन करण्यात आले.
सातारा : सातारा शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने रविवारी शिवतीर्थ पोवई नाका येथे माझं कुंकू माझं देश हे आंदोलन करण्यात आले. महिला आघाडी तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी पहलगाम येथे भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानबरोबर भारतीय संघाचा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे. या प्रकरणाचा निषेध केला, यावेळी शिवसैनिकांनी पवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली.
पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुपट्टी केंद्र सरकारविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये सातारा जिल्हा महिला आघाडीतर्फे साताऱ्यात शिवतीर्थ पोवई नाका येथे माझं कुंकू, माझा देश आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी घेतलेल्या या दुपट्टी निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिरवी साडी, हिरवा खण, हिरव्या बांगड्या आणि लाल कुंकू असा आहेर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्यातर्फे यावेळी पाठवण्यात आला.
यावेळी बोलताना उपनेत्या छाया शिंदे म्हणाल्या भारत-पाकिस्तान अबुधाबी मध्ये आज होणारी मॅच तुम्ही जाहीरच करायला नको होती. शिवसेना पक्षाने या मॅचला पहिल्यापासूनच विरोध केला होता. आणि या संदर्भात आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही मॅच व्हायलाच नको अशी भूमिका मांडली होती.
तरीही आपण ही मॅच आयोजित करून पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या 26 कुटुंबीयांचा घोर अपमान केला आहे, आणि हे भारत कदापि विसरणार नाही. एखाद्या देशाविरोधात आपण बहिष्कार टाकला तर त्याच्या विरोधात द्विपक्षीय असो वा एखादी आंतरराष्ट्रीय मालिका कुठलीही मॅच व्हायलाच नको. पण आपण आपल्या फायद्यासाठी, पैसा कमवण्यासाठी ही मॅच होऊ दिलाचा आरोप यावेळी त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष जय शहा तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात तसेच पाकिस्तानच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी त्यांनी सातारा व सबंध महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की आपण आपल्या देशातील पहलगाम हल्ल्यात 26 माता-भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तान बरोबर असलेली मॅच पाहायला नको आपण त्यावर बहिष्कार करायला हवा.
आणि हीच त्या 26 शहिदांना खरी श्रद्धांजली असेल
यावेळी अमृता पाटील जिल्हा संघटिका सातारा-जावळी, साधना साळुंखे, शांता गुळगे आणि सर्व सातारा-जावली शिवसेना महिला आघाडी उपस्थित होत्या. तसेच सागर धोत्रे युवासेना उपजिल्हाप्रमुख, रमेश बोराटे तालुका प्रमुख सातारा, सुनील पवार सातारा तालुका प्रमुख, गणेश अहिवळे सातारा उपशहर प्रमुख, आकाश धोंडे सातारा उपशहर प्रमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.