टेक अब्जाधिश एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीची स्टारशिप (Starship) हे तंत्रज्ञान वापरून दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को अंतर केवळ ४० मिनिटांत पार करता येत असल्याचा दावा स्वत: स्पेस एक्स सीईओ एलन मस्क यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केले आहे.
दिल्ली : टेक अब्जाधिश एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीची स्टारशिप (Starship) हे तंत्रज्ञान वापरून दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को अंतर केवळ ४० मिनिटांत पार करता येत असल्याचा दावा स्वत: स्पेस एक्स सीईओ एलन मस्क यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केले आहे.
'SpaceX'चे स्टारशिप तंत्रज्ञान
मस्क यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या सरकारमध्ये SpaceX या कंपनीला स्टारशिप रॉकेटचा वापर करून एका तासांत जगातील कोणत्याही दोन शहरांमध्ये प्रवास करणे शक्य होऊ आहे. तसेच हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात शक्य असल्याचे देखील एका एक्स (X) युजर्सने म्हटले आहे. एलन मस्क यांनी नेटकऱ्याने पोस्ट केलेल्या मेसेज आणि व्हिडिओला प्रतिसाद देताना असा दावा केला आहे.
'ट्रम्प यांच्या सरकारमध्ये हे शक्य'; 'X' युजर
एका 'X' युजर्सने म्हटले आहे की, "ट्रम्प यांच्या कार्यकालात SpaceX च्या स्टारशिप अर्थ-टू-अर्थ फ्लाइट्ससाठी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) कडून मंजुरी मिळू शकेल. यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी पोहचण्यासाठी जास्तीत जास्त १ तास आणि कमीत कमी ३० मिनिटांत पोहचता येईल", अशी शक्यता व्यक्त केली आहे. नेटकऱ्याच्या या विचारावर एलन मस्क यांनी सकारात्मकता दाखवत हे शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
SpaceX ने अशा प्रणालीची कल्पना केली आहे जिथे स्टारशिप कक्षेत प्रक्षेपित झाल्यानंतर पृथ्वीच्या "समांतर" प्रवास करते, ज्यामुळे पृथ्वीवरील दूरच्या शहरांमध्ये जलद वाहतूक करणे शक्य आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, स्पेसएक्सचा दावा आहे की, SpaceX च्या स्टारशिपने लॉस एंजेलिस आणि टोरंटो दरम्यानच्या प्रवासाला 24 मिनिटे, लंडन आणि न्यूयॉर्क दरम्यान 29 मिनिटे आणि दिल्ली आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान केवळ 40 मिनिटे लागू शकतात.