दसरा मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी – मंडळांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सदर बाजार येथील भारतमाता मंडळ, युवक क्रीडा सांस्कृतिक मंडळ, भवानीमाता मंडळ, नवचैतन्य दुर्गा उत्सव मंडळ, जय भवानी सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दसरा विजयादशमीच्या मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्य वाजवण्याची परवानगी रात्री १२ वाजेपर्यंत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
सातारा : सदर बाजार येथील भारतमाता मंडळ, युवक क्रीडा सांस्कृतिक मंडळ, भवानीमाता मंडळ, नवचैतन्य दुर्गा उत्सव मंडळ, जय भवानी सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दसरा विजयादशमीच्या मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्य वाजवण्याची परवानगी रात्री १२ वाजेपर्यंत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी शस्त्रपूजन व विजयादशमी वेगवेगळ्या दिवशी आल्यामुळे तांत्रिक कारणास्तव १ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली असली, तरी २ ऑक्टोबरला मिरवणुकीसाठी केवळ रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मंडळांनी नाराजी व्यक्त केली असून, दसरा हा महत्वाचा दिवस असल्याने रात्री १२ पर्यंत परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना मंडळांनी स्पष्ट केले की, २०१६ पासून सर्व मिरवणुका डॉल्बी मुक्त काढल्या जातात तसेच पोलिस प्रशासनास पूर्ण सहकार्य केले जाते. यावेळीही शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करू, असे मंडळांचे पदाधिकारी म्हणाले.
यावेळी भारतमाता मंडळाचे मार्गदर्शक विकास धुमाळ, अध्यक्ष अजित भुतकर, युवक क्रीडा सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष रोहीत शितोळे, मार्गदर्शक योगेश तारळकर, सतीश कांबळे, सादिक बेपारी, राहुल लाड, विशाल इंगवले, राहुल काकडे, विष्णू पवार, विशाल सकट, विजय पवार, निखिल लाड यांच्यासह सर्व मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.