*सोप्या पद्धतीचा वापर करून घरी बनवा चविष्ट दालमखानी*
लहान मुलांसह मोठ्यांना दालमखानी हा पदार्थ खायला खूप आवडतो. नेहमी नेहमी जेवणात डाळ किंवा तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते.
सातारा : लहान मुलांसह मोठ्यांना दालमखानी हा पदार्थ खायला खूप आवडतो. नेहमी नेहमी जेवणात डाळ किंवा तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक घरांमध्ये दालमखानी हा पदार्थ बनवला जातो. मात्र दालमखानी बनवताना डाळीला रंग नीट येत नाही. तर अनेकदा डाळीची चव पूर्णपणे खराब लागते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर भात किंवा चपातीसोबत खाण्यासाठी दालमखानी हा पदार्थ मागवला जातो. पण सतत बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दालमखानी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने दालमखानी बनवल्यास घरातील सर्वच तुमचे खूप कौतुक करतील आणि जेवणात चार घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया हॉटेल स्टाईल दालमखानी बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य :
• उडीद डाळ
• कांदा
• टोमॅटो
• लाल तिखट
• हळद
• मीठ
• तेल
• राजमा
• चण्याची डाळ
• तूप
• पाणी
• आलं लसूण पेस्ट
• फ्रेश क्रीम
• गरम मसाला
कृती :
• दालमखानी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व डाळी स्वच्छ साफ करून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
• कुकरच्या भांड्यात भिजवलेल्या डाळी, राजमा टाकून त्यात पाणी टाका. नंतर वरून चवीनुसार मीठ टाकून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्या.
• कढईमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि आलं लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित भाजा.
• नंतर त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या.
नंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला इत्यादी सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करा.
• मसाले भाजल्यानंतर त्यात मिक्स करून घेतलेली डाळ टाकून व्यवस्थित उकळी काढून घ्या.
• वरून ताजी साय, फ्रेश क्रिम घालून 5 ते 10 मिनिटं दालमखानी शिजवा.
• तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली दालमखानी. या पद्धतीने दालमखानी तुम्ही बनवू शकता.