तामिळनाडूमध्ये संततधार पावसामुळे थमीराबरानी नदी दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे तुतीकोरीन जिल्ह्यातील श्रीवैकुंटम आणि इरल भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे.
तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये संततधार पावसामुळे थमीराबरानी नदी दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे तुतीकोरीन जिल्ह्यातील श्रीवैकुंटम आणि इरल भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे त्रिचीच्या काही भागात पाणी साचल्याने लोकांना स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) तामिळनाडूसाठी अलर्ट जारी केला असून आज दिवसभर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
श्रीलंकेजवळ दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी-दाब प्रणालीचा हा परिणाम असल्याचे IMD ने म्हटले असून १२ तासांत कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर पुद्दुचेरी आणि कराईकल आणि इतर अनेक जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालये १३ डिसेंबर रोजी बंद करण्यात आली होती. तामिळनाडूच्या अनेक भागात आधीच खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. विशेषत: त्रिची शहर पाण्याखाली गेल्याचे आणि घरांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र समोर आले आहे.
दिल्लीत तीन वर्षांतील सर्वात थंड दिवस
दरम्यान, शुक्रवारी दिल्लीत किमान तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामी सरासरीपेक्षा ४.५ अंश से. अधिक आहे. राजधानीत डिसेंबरचा तीन वर्षांतील सर्वात थंड दिवस अनुभवल्याच्या एका दिवसानंतर तापमान ४.५°C पर्यंत घसरले. आज IMD ने कमाल तापमान २३°C आणि किमान ७°C राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.