'तामिळ चित्रपट हिंदीत डब करतात आणि...,'
केंद्र सरकार आणि तामिळनाडू यांच्यातील भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर, जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शुक्रवारी भारताची भाषिक विविधता जपण्याच्या गरजेवर भर दिला.
दिल्ली : केंद्र सरकार आणि तामिळनाडू यांच्यातील भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर, जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शुक्रवारी भारताची भाषिक विविधता जपण्याच्या गरजेवर भर दिला. देशाला फक्त दोन नव्हे तर तमिळसह अनेक भाषांची आवश्यकता आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे. काकीनाडा जिल्ह्यातील जनसेना पक्षाच्या 12 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
"भारताला अनेक भाषांची गरज आहे, फक्त तामिळ किंवा दोन भाषांची नव्हे. आपल्या राष्ट्राची अखंडता राखण्यासाठीच नव्हे तर तेथील लोकांमध्ये प्रेम आणि एकता वाढवण्यासाठी आपण भाषिक विविधता स्वीकारली पाहिजे," असं पवन कल्याण यांनी काकीनाडा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर 'हिंदी लादल्या'चा आरोप केला आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या (एनईपी) त्रिभाषिक सूत्राची अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे. त्याच दरम्यान पवन कल्याण यांनी हे विधान केलं आहे.