ना. अजितदादांची सातारा जिल्ह्याला अचानक धडक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सातार्याला धावती भेट दिली. कुठल्याही लवाजम्याविना येथील शासकीय वश्रिामगृहावर आलेल्या अजितदादांच्या या सप्राईज व्हिजिटने प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले.
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सातार्याला धावती भेट दिली. कुठल्याही लवाजम्याविना येथील शासकीय वश्रिामगृहावर आलेल्या अजितदादांच्या या सप्राईज व्हिजिटने प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले.
ना. पवार येथील नवीन शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबल्यानंतर ते कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना येथे नियोजित कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.
ना. अजित पवार अचानक सातारा जिल्हा दौर्यावर आले होते. नियोजित दौरा नसल्याने, जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्यांसह, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांची धावपळ यावेळी पाहायला मिळाली. शुक्रवारी सकाळी ना. अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक सोडल्यास, शासकीय लव्याजमाविना सातारा शहरातील नवीन विश्रामगृहावर दाखल झाले.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार आमदार व कार्यकर्तेही या दौर्याबाबत अनभज्ञि होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर काही वेळ ते विश्रामगृहाच्या बाहेर उभे होते.
दरम्यान, अजित पवारांच्या या अचानक दौर्यामुळे जिल्हा प्रशासनासह त्याच्याच पक्षातील कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र शुक्रवारी सातारा शहरात पाहायला मिळाले.