रौप्य ग्रंथ महोत्सवाचे साताऱ्यात शानदार आयोजन
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात भव्य स्वरूपात आयोजन केले जात आहे.
सातारा : 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात भव्य स्वरूपात आयोजन केले जात आहे. या तयारीचा भाग म्हणून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे आयोजन दिनांक 7 ते 10 नोव्हेंबर या दरम्यान येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आले आहे. येथील नगरीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरी असे नामकरण करण्यात आले असून तब्बल चार दिवस राहणाऱ्या या साहित्य शब्दमेळाव्यात विविध सांस्कृतिक, साहित्यिक, परिसंवाद आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्राचार्य यशवंत पाटणे व कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सव मध्ये आत्तापर्यंत 60 स्टॉलची नोंदणी झाली असून साहित्य अकादमीचा स्टॉल आकर्षणाचा विषय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
डॉक्टर पाटणे पुढे म्हणाले, "ग्रंथ महोत्सव दरवर्षी जानेवारी महिन्यात भरतो. मात्र जानेवारी महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीचा भाग म्हणून साताऱ्याचा 25 वा ग्रंथ महोत्सव हा नोव्हेंबर मध्येच होत असून दिनांक सात ते दहा नोव्हेंबर यादरम्यान येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर ग्रंथ महोत्सव होणार आहे. यंदा ग्रंथदिंडी ढगाळ हवामानामुळे येथील कर्मवीर समाधी परिसरापासून काढण्यात येणार आहे.साहित्य नगरीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरी तसेच दोन प्रवेशद्वारांना मारुती चितमपल्ली प्रवेशद्वार व जयंत नारळीकर प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक सकाळी सात रोजी ग्रंथ दिंडीचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीर समाधी परिसरात होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार उदयनराजे भोसले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व वा बोधे यांची प्रमुख उपस्थिती आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे उपस्थित राहणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत साताऱ्याच्या आठवणीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने हा परिसंवाद होणार असून यामध्ये ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव, लेखक श्याम भुरके, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे व लेखिका एडवोकेट सीमंतनी नुलकर सहभागी होणार आहेत .सायंकाळी सात वाजता स्वर निनाद निर्मित गाणी सोनेरी चंदेरी हा कार्यक्रम होणार आहे.
यंदा ग्रंथ महोत्सव कार्यक्रमांमध्ये 53 बुक स्टॉल सहभागी होत असून साहित्य अकादमीचा सुद्धा स्टॉल यात सहभागी होणार आहे .मॉरिशसच्या शेतकऱ्याची कथा हे अनोखे पुस्तक या स्टॉलवर वाचकांना उपलब्ध होणार आहे .याशिवाय जिल्हा परिषदेने सुद्धा ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने महावाचन अभियानाची सुरुवात केल्याची माहिती यशवंत पाटणे दिली हा उपक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी राबवला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता ग्रंथ महोत्सवाचा दुपारी तीन वाजता समारोप होणार असून मराठी विश्वकोश मंडळ वाई चे माजी अध्यक्ष राजा दीक्षित हे समारोपाचे प्रमुख पाहुणे आहेत यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ चंद्रकांत दळवीव पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांची प्रमुख उपस्थिती आहे.
ग्रंथमहोत्सव कार्यक्रम पुढील प्रमाणे
शनिवार दि ८ नोव्हें : सकाळी ८.३०वा
i) कथाकथन - बाबासाहेब परीट व डॉ दिलीप गरुड
ii) परिसंवाद : सातारा जिल्ह्यात साहित्यिकांचे योगदानं : दुपारी ३वा
सहभाग - विभागीय अधिस्वीकृत समिती अध्यक्ष - हरिश पाटणे
अध्यक्ष - प्राचार्य राजेंद्र शेजवळ, प्राचार्य डॉ शिवलिंग मेनकुदळे
लोकरंग महाराष्ट्राचा लोकगीत कार्यक्रम - सायं ७वा.
सहभाग - डॉ प्रकाश खांडगे , डॉ गणेश चंदनशिवे, डॉ सुखदा खांडगे, डॉ प्रमिला लोदगेकर.
रविवार दि ९ नोव्हें २०२५
शालेय सांस्कृतिक कार्यक्रम - स ९वा
सहभाग - शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी निरंतर ), प्राचार्य आझाद कॉलेज प्राचार्य डॉ वंदना नलावडे . तुषार पाटील . सेक्रेटरी शिक्षण प्रसारक संस्था करंजे, अनघा कारखानीस मुख्याध्यापिका गोकुळ प्रा शाळा
परिसंवाद - मराठी भाषा अभिजात पुढे काय ? दु ३वा .
अध्यक्ष - विनोद कुलकर्णी कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
वक्ते : डॉ संदीप सांगळे - प्रमुख मराठी अभ्यासक्रम मंडळ, लेखक स्वप्नील पोरे, ज्येष्ठ लेखक - डॉ संदीप श्रोत्री , सुनीताराजे पवार कार्यवाह अखिल भारतीयमराठी साहित्य महामंडळ
मनोरंजन कार्यक्रम सायंकाळी ७वा
डॉक्टर रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तुत लोकवाणी
कलाकार डॉक्टर भावार्थ देखणे आणि सहकारी
सोमवार 10 नोव्हेंबर 2025
परिसंवाद - इथे घडतात वाचक वक्ते
सकाळी 8.30 ते 1
विद्यार्थी सहभाग :मोनिका कुंभार, शांभवी निंबाळकर, अस्मिता वराडकर, अल्पना वराडकर,संस्कृती कांबळे, दिव्यांगणा पंडित, देवेंद्र नितीन धावडे, समीक्षा बनकर, विहान मुळीक, सानवी मोरे, स्वराज सोनवणे, ईशान जाधव, प्रणिती कदम, विराज नागटिळक, परिमला पाटील, स्वरांजली यादव, रुद्रांश जगताप.
प्रमुख उपस्थिती : हिरवाई प्रकल्प संस्थापक प्राध्यापिका संध्या चौगुले
कवी संमेलन
निमंत्रित कवी :- विलास वरे, डॉक्टर मनोहर निकम, यशेंद्र शिरसागर,नरेंद्र निकम, अनिल जाधव, एडवोकेट संगीता केंजळे, जयश्री जगताप, प्रमोद जगताप ,शुभांगी गायकवाड सुरेखा कुलकर्णी क्रांती पाटील,ज तू गारडे, डॉक्टर क्षितिजा पंडित, सूत्रसंचालक संवादक प्रदीप कांबळे
सायंकाळी ७ वाजता विजय साबळे प्रस्तुत गाणी मनातली संगीत कार्यक्रम
कलाकार :- डॉक्टर सुनील पटवर्धन, विजय साबळे, डॉक्टर सुहास पाटील, दिपाली घाडगे, सीमा राजपूत,अपर्णा गायकवाड