शैक्षणिक धोरणाच्या कालखंडात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची
जागतिकीकरणाच्या काळामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण होत असताना संख्यात्मक दृष्ट्या निर्माण झालेल्या शिक्षण व्यवस्थेचे कोणतेही अप्रूप नाही.
सातारा : जागतिकीकरणाच्या काळामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकरण होत असताना संख्यात्मक दृष्ट्या निर्माण झालेल्या शिक्षण व्यवस्थेचे कोणतेही अप्रूप नाही. तंत्रदिष्टित आजच्या युगामध्ये शैक्षणिक धोरण सकस आणि कसदार ठरण्यासाठी शिक्षकांचीच भूमिका महत्त्वाची आहे. जागतिकीकरणांमध्ये गुणवत्ता हाच एकमेव निकष असेल असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर समाधी परिसरात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्हाईस चेअरमन एडवोकेट भगीरथ शिंदे संघटक डॉक्टर अनिल पाटील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे एडवोकेट दिलावर मुल्ला जेके जाधव भैय्यासाहेब जाधव डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार मदन भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
निरगुडकर पुणे म्हणाले भारताने तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती केली आहे काही तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वावलंबनाचे धोरण स्वीकारण्याच्या तयारीत भारत आहे. हा प्रयोग यशस्वी होईल आणि पुढील 25 वर्षात जगभरात सॉफ्टवेअर निर्यात भारत अग्रेसर असेल तरुणाई नेमके काय करू शकते यावर देशाचा भविष्य काळ अवलंबून आहे. मात्र शिक्षण प्रक्रियेत गुणात्मकता हरवता कामा नये शैक्षणिक धोरण ठरवताना बदलत्या शैक्षणिक आव्हानांचा आणि विषयांचा जाणीवपूर्वक अभ्यास झाला पाहिजे. यामध्ये शिक्षकांचीच भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. शिक्षकांमध्ये पिढी घडवण्याची ताकद असते त्यांच्या ठाई असणारी शैक्षणिक आणि बौद्धिक गुणवत्ता ही कोणीही चोरून नेऊ शकत नाही. उत्कृष्ट गुणवत्ता रयत शिक्षण संस्थेचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणारा शिक्षक हाच शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. सुसंगत शिक्षण व्यवस्थित बदल करणे आणि त्याला परिणामकारक स्वरूप देणे रयत शिक्षण संस्थेचे हे लवचिक धोरण खरोखर वाखाणण्याजोगे आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. इंटर ऍक्टिव्ह पॅनल कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण इआरपी सॉफ्टवेअर संशोधन आणि विकास विषयक धोरणाची त्यांनी माहिती दिली विज्ञान पत्रिका आणि विद्यार्थी संघटना पोर्टल यांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट न्याक मानांकन मिळवणारी महाविद्यालय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेली विद्यार्थी आणि पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कर्मवीर जयंतीनिमित्त साताऱ्यातून रयत सेवक विद्यार्थी यांनी काढलेल्या कर्मवीर फेरीला प्रतिसाद मिळाला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती प्रतापसिंह महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यांना पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले प्रास्ताविक संस्थेची सचिव विकास देशमुख यांनी केले. पुरस्कार वितरणाचे निवेदन उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.