सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक येथील शाहू कला मंदिरामध्ये सायंकाळी उशिरा पार पाडली.
सविस्तर वृत्तराज्य उत्पादन शुल्क विभागाने परमिट रूमला दहा टक्के वॅट आकारणी, अनुज्ञप्ती फी मध्ये 15 टक्के वाढ आणि एक्साईज ड्युटी मध्ये दीडशे टक्के वाढ ही राज्य शासनाची करप्रणाली अन्यकारक असून त्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील मद्यविक्रीचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि आण्णासाहेब कल्याणी शैक्षणिक संकुल विद्यालयामध्ये विधी सेवा शिबीर व आंतरराष्ट्रीय ड्रग्ज गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.
सविस्तर वृत्तएका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ ग्रामस्थांवर आली.
सविस्तर वृत्तबौध्द धम्मातील वर्षावासाकडे नुसता धार्मिक विधी म्हणून पाहू नका. हा कालावधी बौद्ध धम्मगुरु, बौध्द भिक्षुच्यासाठी धम्माचे चिंतन,मनन,आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी समतानगर (विडणी)येथे वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
सविस्तर वृत्तकाही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून, कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवावी.
सविस्तर वृत्तमिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या.
सविस्तर वृत्तसाताऱ्यातील डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य अंधश्रध्दा निर्मूलनासाठी घालवले. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीची चळवळ साताऱ्यात सुरू करुन महाराष्ट्रात पसरवली.
सविस्तर वृत्तश्री क्षेत्र पंढरपूरहून आळंदीकडे निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण येथील रविवार पेठेतील श्री संत नामदेव महाराज शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये विसावला.
सविस्तर वृत्तसर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी घेण्यास नकार दिला असून, ऑगस्टमध्ये सुनावणी करणार असल्याचं सांगितलं आहे.
सविस्तर वृत्त