सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतीक विनायक नलवडे (वय ३०, रा. मंगळवार पेठ, सातारा) व विकी संजय मोहिते (वय ३०, रा.मंगळवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस मच्छिंद्रनाथ माने यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. ४ ऑक्टोबर रोजी घडली आहे. संशयित दोघे मारामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग केला. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.