दुर्गादेवी आगमन मिरवणुकीत आदेशाच उल्लंघन केल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल
दुर्गादेवी आगमन मिरवणुकीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बाजार येथील दोन मंडळातील कार्यकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : दुर्गादेवी आगमन मिरवणुकीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बाजार येथील दोन मंडळातील कार्यकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीची मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ढोल ताशा वाजवत मिरवणूक काढल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस हवालदार धीरज दीपक मोरे आणि विश्वनाथ वसंत मेचकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहित श्रीकांत शितोळे, भिकाजी वामन शिंदे, अक्षय राजेंद्र माळवदे, संजय रामचंद्र मेथा, योगेश विनायक तारळकर, विशाल कोळी, अजित नंदकुमार भुतकर,तुषार सत्यवान आवळे, सिद्धेश महादेव किर्दत,अक्षय दत्तात्रेय शिंदे, अजिंक्य सुधाकर सपकाळ, निखिल मोहन रजपूत, मंगेश डहाणे, गणेश हनुमंत भोसले सर्व राहणार सदर बाजार अस गुन्हा दाखल झालेल्या संशितांची नाव आहेत. दुर्गादेवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.