महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
रस्त्यावर रुमालात बांधलेल्या दोन सोन्यासारख्या वीटा सापडल्यानंतर दोघांनी महिलेला त्यातील एक वीट देण्याचा बहाणा करत ९ ग्रॅम वजनाचा ऐवज नेवून फसवणूक केली.
सातारा : रस्त्यावर रुमालात बांधलेल्या दोन सोन्यासारख्या वीटा सापडल्यानंतर दोघांनी महिलेला त्यातील एक वीट देण्याचा बहाणा करत ९ ग्रॅम वजनाचा ऐवज नेवून फसवणूक केली. ही घटना राधिका रोड येथील मार्केट यार्ड परिसरात घडली आहे.
सुरेखा मारुती सावंत (वय ५७, रा. लिंब ता.सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. ९ सप्टेंबर रोजी घडली आहे. तक्रारदार महिला पायी चालत जात असताना संशयित दोघांनी महिलेची फसवणूक करुन त्यांच्या कडील सोन्याचा ऐवज लंपास केले.