जुगार प्रकरणी एकावर कारवाई
जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास विनायक पांडुरंग महाडिक रा. यादोगोपाळ पेठ, सातारा हे सातारा शहरातील राजवाडा टॉवर इमारतीतील पार्किंगच्या शेजारी असलेल्या जिन्याच्या आडोशाला जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 2005 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.