जबरी चोरी प्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा
जबरी चोरी प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : जबरी चोरी प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संगमनगर येथे एका महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्या गळ्यातील बेन्टेक्स चे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.