सुमारे साडेपाच लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांवर गुन्हा
एका महिलेची सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एका महिलेची सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात वास्तव्यात असलेल्या एका महिलेला दुकानाच्या भांडवलासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यानुसार तिने युनियन बँक ऑफ इंडिया एमआयडीसी शाखा येथे कर्ज प्रकरण केले. यावेळी गणेश भोसले आणि समीर शेंडे या दोघांनी बँकेत ओळख आहे, असे दाखवून 9 लाख 90 हजार रुपये कर्जातील केवळ 4 लाख 35 हजार रुपये तक्रारदार महिलेस देऊन उर्वरित 5 लाख 55 हजार रुपये स्वतःकडे ठेवून ते महिलेस अथवा बँकेत न भरता फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.