अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
अवैधरीत्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरीत्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास रमेश दिनकर दुदुस्कर रा. माळ्याची वाडी, ता. सातारा हे तेथीलच एका गुराच्या गोठ्याच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून आठशे रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.