सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात मारामारी, दोघांवर गुन्हा
सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात हाणामारी करणार्यांविरुध्द पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहन संजय इंगळे (वय २४), रोहित दिलीप फाळके (वय २३, दोघे रा.सातारा रोड पाडळी ता. कोरेगाव) या दोघांवर गुन्हा झाला आहे.
सातारा : सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात हाणामारी करणार्यांविरुध्द पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहन संजय इंगळे (वय २४), रोहित दिलीप फाळके (वय २३, दोघे रा.सातारा रोड पाडळी ता. कोरेगाव) या दोघांवर गुन्हा झाला आहे. दि. १७ सप्टेबर रोजी दोघे संशयित एकमेकांना मारहाण करत होते. तसेच आरडाओरडा करत होते. यामुळे पोलिस अमोल हसबे यांनी दोघांविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिली.