संगमनगर परिसरात सुमारे तीन लाखांची घरफोडी
संगमनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : संगमनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३१ रोजी सकाळी ११ ते दुपारी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान गणेश नामदेव जाधव राहणार संगमनगर सातारा यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. घटनास्थळी सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.