दुचाकी ट्रॅक्टर अपघात प्रकरणी एकावर गुन्हा
रामनगर ता.सातारा येथे अपघात झाल्याप्रकरणी अक्षय महेंद्र डांगे (वय ३०, रा. नेले पो.किडगाव ता.सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : रामनगर ता.सातारा येथे अपघात झाल्याप्रकरणी अक्षय महेंद्र डांगे (वय ३०, रा. नेले पो.किडगाव ता.सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुदाम परबती गोगावले (वय ६७, रा. रामनगर ता.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १५ सप्टेबर रोजी घडली आहे. तक्रारदार हे रामनगर येथे कट्ट्यावर बोलत थांबले होते. यावेळी ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात होवून दुचाकीची तक्रारदार यांना धडक बसल्याने ते जखमी झाले.